जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे मॉर्डन गर्ल्स हायस्कूल आणि पुष्पावती खुशाल गुळवे मुलींच्या माध्यमिक विद्यालयात गरजू, होतकरू विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक शाळेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे नूतन अध्यक्ष ओमप्रकाश सिंह, सचिव संजयकुमार तापडिया यांनी क्लबच्या विविध सामाजिक, सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. मुलींनी शैक्षणिक प्रगती खूप करावी. गरजू मुलींना शिक्षणासाठी शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन ओमप्रकाश सिंह आणि संजयकुमार तापडिया यांनी दिले.
या उपक्रमासाठी डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल राजीव बियाणी, मेडिकल डायरेक्टर लक्ष्मीकांत मणियार यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाची जबाबदारी प्रोजेक्ट चेअरमन मीत मेहता यांनी सांभाळली. यावेळी रुपेश काबरा, प्रीतम लाठी, सोनिया मेहता आदी उपस्थित होते.
