Home » जळगाव » प. वि. पाटील व ए.टी.झांबरे विद्यालयात डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्ती चे वाटप

प. वि. पाटील व ए.टी.झांबरे विद्यालयात डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्ती चे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे शिष्यवृत्तीचे वितरण इयत्ता पहिली ते नववी च्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्यात प्राथमिक गटात पूर्वेश पवार, केशरी कमोदे, पाटील, सोहम भारंबे, जयदीप पाटील, सार्थक शिंपी, आयुष निकुंभ, कीर्ती धनगर, तन्मय मराठे, अनुष्का मिस्तरी, प्रियल कोळी, हितेन माळी, चिराग पवार, नव्या बोंडे, कार्तिक बाविस्कर, अनुष्का बावस्कर, हर्षदा अस्वार, नितेश चौधरी, देवर्षी चोपडे, स्वरा पाटील … तर माध्यमिक गटात प्रदीप जाधव, जानवी ठाकूर, देविका कांमळसकर, रितेश पाटील, तन्मय  सरोदे, विश्वप कमळस्कर, रितेश  जाधव, रोशनी दुसाने, लावण्या चौधरी, निवृत्ती राठोड, रोहित पाटील, गिरीश सोनवणे यांना शिष्यवृत्ती चे वाटप करण्यात आले.

शिष्यवृत्तीचे वाटप के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापक प्रणिता झांबरे तसेच मुख्याध्यापक धनश्री फालक, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!