Home » जळगाव » तायक्वांडो स्पर्धेत ४४किलो वजन गटात देवयानी पाटील हिला कांस्यपदक

तायक्वांडो स्पर्धेत ४४किलो वजन गटात देवयानी पाटील हिला कांस्यपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रत्नागिरी येथे दिनांक २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान  झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची देवयानी भिला पाटील हिने मुलींच्या ४४किलो आतिल वजन गटात कांस्यपदक पटकावले आहे. नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत सुद्धा तिने कांस्यपदक पदक पटकाविले होते.

तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर, अजित घारगे याचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!