Headlines
Home » महाराष्ट्र » उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले दिवंगत संतोष देशमुख यांच्या परिवाराचे सांत्वन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले दिवंगत संतोष देशमुख यांच्या परिवाराचे सांत्वन

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासन काम करीत आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशी दिली जाईल यासाठी मी स्वतः या प्रकरणात पूर्ण लक्ष देणार आहे, अशी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वन भेटप्रसंगी ते बोलत होते.

दिवंगत देशमुख यांची पत्नी, मुलगी तसेच भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी त्यांनी घटनेबाबत चर्चा करून माहिती घेतली व शासन सर्व प्रकारे या प्रकरणात तपास करून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देईल असे सांगितले. सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

शासनाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. त्यांनी दिवंगत देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. पोलीस आपल्या पद्धतीने तपास करीत आहेत सोबतच न्यायालयीन चौकशी सुरू असून यात कुठलीही त्रुटी राहणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या घटनेमागे कोणी मास्टरमाईंड असेल तर त्यालाही सोडले जाणार नाही. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सोबत रमेश आडसकर, डॉ. योगेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!