Home » महाराष्ट्र » नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे कायम

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे कायम

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने (कॅट) दि.५ मार्च रोजी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे डॉ. बी.जी. शेखर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय दिला आहे. परंतु यासंदर्भात शासनाने अद्याप आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी अजुनही दत्तात्रय कराळे कायम आहेत.

लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते, तर सहायक व उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली. त्यानुसार बऱ्याच अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होत कामकाजास सुरुवात केली आहे. दरम्यान, गृह विभागाने डॉ. बी.जी. शेखर यांची बदली करून त्यांच्या जागी ठाणे शहराचे सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती केली होती. कराळे यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी नाशिक परिक्षेत्राची सूत्रे हाती घेतली. परंतु, डॉ. बी.जी. शेखर यांनी ‘कॅट’मध्ये याचिका दाखल केली होती. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी तसेच मे अखेरीस निवृत्त होत असतानाही त्यांचे बदलीचे आदेश निर्गमित केल्याचा दावा डॉ. शेखर यांनी याचिकेत केला होता.

त्यानुसार ५ मार्च रोजी ‘कॅट’ने (Central Administrative Tribunal (CAT)) अंतिम निर्णय देत डॉ. शेखर यांच्या बदलीस स्थगिती देत पुन्हा नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर गृह विभागाने सुधारित आदेश न काढल्याने डॉ. शेखर यांची नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे दत्तात्रय कराळे यांच्याकडेच परिक्षेत्राची जबाबदारी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!