Home » जळगाव » नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्याच वर्षापासून शहरात सुरू झालेल्या नुपुर नृत्यांगण ह्या कथ्थक क्लासच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई आयोजित प्रवेशिका प्रथम परीक्षेस यावर्षी ४ विद्यार्थिनी बसल्या होत्या. ही त्यांची पहिलीच परीक्षा होती. गुरु नूपुर चांदोरकर-खटावकर या नुकत्याच आफ्रिकेहून जळगावला आल्यानंतर त्यांनी नुपुर नृत्यांगण क्लास ची स्थापना केली.

नूपुर चांदोरकर-खटावकर या डॉ. अपर्णा भट व शमाताई भाटे, पुणे यांच्या शिष्या असून त्यांनी ललित कला केंद्र, पुणे येथून कथ्थक मध्ये एम.ए. केले आहे. यावर्षी क्लासच्या स्थापनेनंतर त्यांच्या पहिल्या बॅचच्या चार विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यात कनिष्का कुलकर्णी, लावण्या कुलकर्णी, ओवी धानोरकर आणि अनघा कुलकर्णी या चारही विद्यार्थिनी डिस्टिंगशन मध्ये उत्तीर्ण झाल्या असून या मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डावीकडून कनिष्का कुलकर्णी, लावण्या कुलकर्णी, गुरु नुपूर चांदोरकर-खटावकर, ओवी धानोरकर, अनघा कुलकर्णी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!