अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील मारवड महसूल मंडळात दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे कळमसरे व वासरे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी आज करण्यात आली.

याप्रसंगी करनवाल यांनी आपतग्रस्त ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक ती मदत व उपाययोजनांबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे तसेच प्रशासन हे नागरिकांसोबत असून, नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
या पाहणीदरम्यान मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, रुपेशकुमार सुराणा तहसीलदार अमळनेर, नरेंद्र पाटील गटविकास अधिकारी आदी मान्यवर तसेच गावकरी उपस्थित होते.

