मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ; पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस

जालना, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली होती. यावेळी चौथ्यांदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी प्रकृती अधिकच खालावली आहे. सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षणाचा कायदा तातडीने लागू व्हावा, या मागणीसाठी आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी…

Read More

राज्य परिवहन महामंडळाच्या ५१५० इलेक्ट्रिक बसेस चे लोकार्पण ; आरामदायक प्रवास शक्य

ठाणे, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्य परिवहन महामंडळाच्या ५१५० इलेक्ट्रिक बस योजनेचा लोकार्पण सोहळा आज ठाण्यातील खोपट एसटी स्थानकात पार पडला. एसटी ही राज्याची लाईफलाईन आहे. एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर यांचे कायमच गावकऱ्यांशी ऋणानुबंधाचे नाते आहे. ग्रामीण भागाच्या विकासात एसटीचे मोठे योगदान आहे. काळानुरूप एसटीमध्ये एनेक बदल झाले असून आता एसटीच्या ताफ्यात ५१५०…

Read More

पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला लागली आग

पुणे, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला रात्री आग लागली,अग्निशमन दलाच्या जवानांनी आग ३०मिनिटांच्या अथक प्रयत्नांनी आटोक्यात आणली .पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला लागलेली ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी…

Read More

गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीचे भूमिपूजन

गोंदिया ,दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती. नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम, दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री…

Read More

भ्याड हल्ल्यांनंतरही निखिल वागळेंनी पुण्यात निर्भय बनून “निर्भय बनो” कार्यक्रम यशस्वी करून दाखविला .

मुंबई दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याकडून ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं . पण ते कार्यक्रम स्थळी रस्त्याने आपल्या गाडीतुन जात असतांना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली . या सर्व घटनेवर आता…

Read More

मनसेतुन दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी ; राज ठाकरेंकडून मोठी कारवाई

मुंबई दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातून दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन मोठी कारवाई केली आहे . परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज अशी हकालपट्टी करण्यात आलेल्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पक्षातून हकालपट्टी का केली गेली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण राजकीय वर्तुळात या कारवाईमुळे विविध…

Read More

जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. ०८ ( वास्तव पोस्ट न्यूज़ ) मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महासंघाने केलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या लवकरच पूर्ण केल्या जातील. महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे…

Read More

एमएसआरटीसी च्या पाच हजार डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांत होणार रूपांतर ; दरवर्षी सुमारे २३४ कोटींची बचत

मुंबई दि. ६ (प्रतिनिधी ) – महाराट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे, त्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट…

Read More

नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मॅट मध्ये धाव

नाशिक दि. ६ ( प्रतिनिधी ) – नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या…

Read More

१५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार ; मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. ६ ( प्रतिनिधी ) – मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वेक्षण चालू असलेलं सर्वेक्षणाचं हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाईल . याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले, की मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी चालू असलेलं सर्वेक्षण पूर्ण होत आलं…

Read More

निवासी डॉक्टरांपाठोपाठ ‘या’ तारखेपासुन राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही काम बंद आंदोलनावर

पुणे दि. ६ ( प्रतिनिधी ) – राज्यात आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र सरकार मतदारांना खूष करण्यासाठी वेगवेगळ्या योजना पूर्ण करत आहे . एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय, दुसरीकडे निवासी डॉक्टरांच्या मागण्या आणि त्यात भर आता शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जाणार आहेत. यामुळे राज्यात सरकारची सर्वच बाजूने कोंडी होताना दिसत आहे. कोकणातील सावंतवाडीमध्ये झालेल्या अधिवेशनात शिक्षकेतर…

Read More

तर …१० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार ; जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

रायगड दि. ३० ( प्रतिनिधी ): मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. राज्य सरकारने येत्या १५ दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. ९ तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे. जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

आरक्षण देतांना कोणावरही अन्याय होणार नाही ; न्यायालयाच्या आदेशाशिवाय गुन्हे मागे घेता येणार नाही

नागपूर ( प्रतिनिधी ) दि .२७, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या १३ मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाही . असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.२७ रोजी माध्यमांशी बोलताना सांगितले . फडणवीस यांनी सांगितले की, आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मात्र घरे जाळणे, थेट…

Read More

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, ( प्रतिनिधी ) दि.२६: मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार झिशानबाबा सिद्दिकी, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी मनोज गुहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागुल, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, अंजली भोसले, तेजस…

Read More

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, ( प्रतिनिधि ) दि.२६ : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे…

Read More
error: Content is protected !!