Headlines

राज्यमंत्री बोर्डीकर यांनी घेतला आरोग्य सुविधा, मनुष्यबळ आदीबाबींचा आढावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचा आढावा…

Read More

तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्या : पालकमंत्री जयकुमार रावल

नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शानदार शुभारंभ… धुळे ( वास्तव पोस्ट ) : “प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि प्रशासन अधिक गतीमान होईल,” असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. नाशिक विभागीय महसुल क्रीडा व…

Read More

पुणे जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे मृतांची संख्या पोहोचली ६ वर

पुणे ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर संशयित गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे मृतांची संख्या सहा झाली आहे. गुरुवारी एका आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ताप, अतिसार आणि पायांमध्ये अशक्तपणाची तक्रार केल्यानंतर या वृद्ध व्यक्तीला सिंहगड रोड परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि चाचण्यांमध्ये त्यांना जीबीएस असल्याचे दिसून आले, असे अधिकाऱ्याने…

Read More

मंत्रालय प्रवेशासाठी फेशियल रिकॉग्नीनेशन यंत्रणा ; सुरक्षिततेमध्ये वाढ तसेच कामात पारदर्शकता येणार !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे…

Read More

महानुभाव पंथीयांची ५०० वर्षांची परंपरा असलेले ‘श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर’ कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

नांदेड ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हदगाव, नांदेड येथील श्रीकृष्णदेव उखळाई मंदिराचा नवपर्व व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उखळाईमायचे दर्शन घेऊन विडाअवसर केले, तसेच श्रीकृष्ण मूर्तीचे अनावरण केले. जिथे सर्वांची मनोकामना पूर्ण होते, गरिबांना आधार मिळतो आणि दुःखितांच्या वेदनांवर…

Read More

दूध व्यवसायात बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध : मंत्री अतुल सावे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या…

Read More

नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे.  न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली विधी महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेशातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होण्याकरिता सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, महसूल व वन विभागांनी आवश्यक परवानग्या तातडीने देऊन भूसंपादन प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण करावी. तसेच वन विभाग, एमएमआरडीए, सिडको…

Read More

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे लोकार्पण… मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे….

Read More

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” जानेवारी २०२५ चा लाभ सुरु !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते, त्यानुसार लाडकी…

Read More

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची भाडेवाढ करण्यास मान्यता ; २५ जानेवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ लागू !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक २५ जानेवारी २०२५ (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल, अशी माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल,…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष”

वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही…

Read More

महायुतीमध्ये नाराजी नाट्य ! नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निकाल लागून मोठा कालावधी लोटला असला तरी महायुतीमधील नाराजी नाट्य मात्र काही थांबायचे नाव घेत नाहीये. नाशिकमध्ये भाजपचे नेते गिरिश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वादाला सुरुवात झाली आहे. याच मुळे आता राज्य सरकारने या दोन्हीही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाला…

Read More

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; गडचिरोली पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे…

Read More

सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारत लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहचेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

NATIONAL STARTUP DAY 2025 : सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारत लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहचेल, आणि भारताची निर्विवाद स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रच असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५’ कार्यक्रमाचे मुंबई येथे…

Read More
error: Content is protected !!