Headlines
Home » जळगाव » Page 60

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन; मुक्ताईनगर पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी देणार

शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनाचा “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत…

Read More

जळगाव जिल्ह्यासाठी अठरा ‘आपतकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीट’

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले उदघाटन जळगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या ‘आपातकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीटचे’ उदघाटन ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, मदत…

Read More

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. जळगाव | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात सध्या विविध भागात रस्त्यांचे कामं सुरु आहे. आज कलेक्टर आयुष प्रसाद यांनी महानगरपालिका अंतर्गत नव्या रस्त्यांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद देखील साधला .यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकांकडून गुणवत्ता…

Read More

जैन इरिगेशन कंपनीच्या ‘अॅग्रीकल्चर फॉरेस्टरी अॅण्ड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land Use) (AFOLU) प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प शेतीचे उत्पन्न वाढवतांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, मातीतील सेंद्रिय कार्बन सुधारण्यास आणि शेतीच्या पातळीवर कार्बन साठवणूक करण्यासाठी सक्षम करण्यास मदत…

Read More

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठीच्या १५ व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

जळगाव | दि.०१( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामासाठी मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेल्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी आज घेतला. ग्रामपंचायतींच्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सर्व आवश्यक सहकार्य करणे आणि तांत्रिक मंजुरी आणि कामाच्या मोजमाप बुक नोंदीसाठी अभियंते दिले…

Read More

विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण; अजित जैन यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रोजेक्ट सादरीकरणाचे उद्घाटनाप्रसंगी (डावीकडून) सौ. निशा जैन, अजित जैन, देबासिस दास व शिक्षकवृंद जळगाव | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )- अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ५ वी ते ८ व्या इयत्तेसह सर्व विद्यार्थ्यांनी ३७ प्रोजेक्ट साकारले आहेत. समाज हितासाठी उपयुक्त असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेतून प्रोजेक्टच्या संकल्पनांवर काम केले. यात…

Read More

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित नागरिक व शेतकरी यांना मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या ५ कलमी सूचना

जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– काल रात्री जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बाधित नागरिक व शेतकरी यांना मदतीसाठी सर्व तालुक्यांना जळगाव ५ कलमी सूचना जारी केल्या आहेत . १. इतर सज्जाच्या तलाठी गावांचे वाटप करून पुढील ४८ तासांत पंचनामा पूर्ण करा. कोणतेही…

Read More

पर्यावरणीय संसाधनाचा नाश रोखण्यासाठी वन व पोलिस विभागाकडून संयुक्त बैठक संपन्न

जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पर्यावरणीय संसाधनांचा नाश रोखण्यासाठी बैठक संपन्न झाली. वन विभाग, पोलीस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी व समनव्यातुन पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेबाबत चर्चा करण्यात आली. वनव्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद…

Read More

भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण

जळगाव | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘कर्म हेचि जीवन’ मानणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन अर्थात मोठेभाऊ यांचा आज ता. २५ फेब्रुवारी श्रद्धावंदन दिन निमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या वतीने ‘भक्ती संगीत संध्येतून मोठ्याभाऊंच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण करण्यात आले. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तनतर्फे आयोजित सहा दिवसीय मैत्र…

Read More

तापी नदी पात्रातील नांदेड येथील शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा प्रशासनाने घरकुलांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश..! जळगाव दि.२३,( वास्तव पोस्ट न्यूज )– वाळू ही बांधकामासाठी लागणारी अत्यावश्यक गोष्ट असल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार घडतात. दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते, म्हणून राज्य सरकारने १६ फेब्रुवारी २०२४ ला नवे धोरण जाहीर केले. त्याप्रमाणे आता वाळू ६०० रुपये प्रती ब्रास मिळणार…

Read More

चोपडा येथील नुतन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन ; प्रशासकीय कामांना गती मिळणार

चोपडा, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महसूल यंत्रणा ही गतिमान यंत्रणा म्हणून ओळखली जाते. चोपडा येथे अत्याधुनिक अशी प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे कामाला गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तालुका प्रशासनाला नव्या इमारतीसाठी शुभेच्छा देऊन आपले अनुभव…

Read More

जळगाव मध्ये ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत;प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव,दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात दि ३ मार्च, २०२४ रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा…

Read More

जिल्हा वार्षिक नियोजन मधून स्पीलचे कामं ३१ मार्चच्या आत पूर्ण करा ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्हा वार्षिक नियोजन मधून सन २०२२-२३ मध्ये दिलेल्या मान्यताचे स्पीलचे काम करायचे असेल तर त्याच्यासाठी ३१ मार्चची मुदत असेल. त्यानंतर लागणारा निधी जिल्हा नियोजन मधून दिला जाणार नाही असे स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक नियोजन मधून दिलेल्या विविध शासकीय कामाचा आढावा अल्प बचत भवन…

Read More

जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत एकोणचाळीस हेक्टर पेक्षा जास्त वनहक्क दावे मंजूर

जळगाव दि. २२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) जळगाव जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्क दावेदारांच्या दाव्यांना मान्यता देण्यात आली असून दावेदारांना एकूण ३९.८९१ हेक्टर आर जमीनीचे वनपट्टे मंजुर करण्यात आले आहेत. प्रलंबित उर्वरित वनदावेदारांचे दावे तात्काळ कार्यवाही करुन निकाली काढण्यात येतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार याबाबत निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.२१ फेब्रुवारी…

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती

जळगाव, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँगेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव महानगरातून…

Read More
error: Content is protected !!