Headlines
Home » जळगाव » Page 59

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; सौर कृषिपंप उखडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील शिंदी पेडगाव या गावांसह आजुबाजूच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पाऊस आणि चक्रिवादळामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले. तसेच पेडगाव शिवारातील शेतकरी योगेश चैत्राम पाटील व संजय चुडाम पाटील यांच्या शेतातील विहीर लगत असलेला सौर कृषीपंप संच पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे जमिनीतून…

Read More

रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ ; राज्यातून एकमेव महिला

Raksha Khadse took oath as Union Minister of State :रावेरच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपती यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रक्षा खडसे या मंत्रिमंडळातील दुसऱ्या सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रक्षा खडसे ह्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार…

Read More

जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी दीपक पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे पदोन्नतीसह बदलीचे आदेश काढले असुन जळगाव प्रादेशिक परिवहन विभागाला नवीन आरटीओ अधिकारी मिळणार आहेत. दरम्यान दीपक पाटील यांना जळगाव आरटीओ पदी पदोन्नती देण्यात आली असुन दीपक पाटील हे दि.१० सोमवार रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील. दीपक पाटील हे…

Read More

५००० रूपयांची लाच घेतांना पिंप्राळा मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :शासकीय कार्यालयात आपली कामे करुन घेण्यासाठी अनेकांना विविध अनुभव येत असतात. बऱ्याचदा आपली कागदपत्रे पूर्ण असतांना देखील ‘विशेष व्यावहारीक पूर्तता’ न केल्याने कार्यालयात विनाकारण चकरा माराव्या लागतात. असाच काही अनुभव सावखेडा येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तिस आला. सात बारा उताऱ्यावर नाव लाऊन देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यास लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडण्यात…

Read More

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला पाच दिवसांत छडा; तरवाडे येथुन सोन्याचे दागिने लांबविणारा चोरटा ताब्यात

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ): चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामीण पोलिस स्टेशनला मुजाहिद जमशेद मोलाना रा. पिपरखेळ ह.मु.तरवाडे ता.चाळीसगाव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सोन्याची पोत व कानातील रिंग असा ६०हजाराचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिली होती. त्याआधारे पोलीसांनी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी शाहरुख शेख लाल रा.तरवाडे…

Read More

प्रभाकर चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथील रहिवाशी व मुळचे फैजपूर येथील प्रभाकर नामदेव चौधरी यांचे ३० मे रोजी सकाळी ६.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८२ वर्षांचे होते. फैजपूरच्या न.पा. हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते जैन…

Read More

धक्कादायक : भुसावळमध्ये धावत्या कारवर गोळीबार करून दोघांचा खून ; मृतात माजी नगरसेवकाचा समावेश

भुसावळ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रेल्वेचे मोठे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात गोळीबार करून दोन जणांचा खून करण्यात आला. अक्षरशः सिनेस्टाईलपणे धावत्या कारवर गोळीबार करून हल्लेखोरांनी दोघांना संपवलं. यामुळे भुसावळ शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या गोळीबारात भुसावळ शहराचे माजी नगरसेवक…

Read More

जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश मोहम्मद काशिम शेख मुसा शेख व जिल्हा लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचे सचिव सलीम पिरमोहम्मद सैय्यद यांनी जळगाव जिल्हा कारागृहास भेट देवून मॅाडर्नायझेशन अंतर्गत किॲाक्समशिन, २०५ कॅमेरेसह सिसीटिव्ही नियंत्रण कक्ष, ०५ नग ॲलन स्मार्ट कार्ड टेलीफोन सुविधा, ०६ नग कोर्टपेशीसाठी व्हिसी कक्ष, ०३ नग बंदी नातेवाईक-वकिलभेटीसाठी…

Read More

तलाठ्यास ५ हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक ; रेती वाहतुकीसाठी लाचेची मागणी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चोपडा तालुक्यातील विटनेर येथील रविंद्र काशिनाथ पाटील या तलाठ्यास रेतीच्या वाहतुकीसाठी ५ हजाराची लाच स्विकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराच्या सासऱ्याचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजुर झाले होते. त्याच्या बांधकामासाठी तक्रारदारास रेतीची आवश्यकता होती. दरम्यान रेतीच्या वाहतुकीसाठी तलाठी रविंद्र पाटील याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची…

Read More

उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण ; पारा ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता !

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्य भयंकर आग ओकत असून उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण झाले आहेत. रविवारी तर तापमानाने नवा उच्चांक गाठला. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाने ४४ अंशाचा टप्पा गाठला. तापमान वाढीने प्रचंड उकाडा जाणवत असून या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची जळगावकर असोशीने वाट पाहत आहेत. मात्र, आगामी…

Read More

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी ; कंपनीच्या एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

जळगाव | दि. १८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात कंपनीच्या कन्सोलिडेटेड वार्षिक विक्रीत ७ टक्क्यांची वाढ व नफा ९१ कोटी रुपये झाला…

Read More

पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर अपघात ; १ महिला जागीच ठार तर ३ जखमी

पाचोरा | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा शहरात जारगाव चौफुलीवर जळगावकडे जातांना ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात तीन जण जखमी झाले असुन एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. अपघातातील ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी शेख इस्माईल अब्दुल नबी मणियार…

Read More

जळगाव लोकसभा मतदार संघात ५८.४७% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% झाले मतदान

जळगाव | दि १४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ५८.४७% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% मतदान झाले. सोमवार दि.१३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला दोन्ही मतदार…

Read More

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव येथे अशोक जैन यांनी केले सपत्नीक मतदान

जळगाव | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. आज १३ मे रोजी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात निवडणुका होत आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात जैन इरिगेशन्स सिस्टिम लिमिटेड चे चेअरमन अशोक जैन यांनी पत्नी ज्योती जैन यांच्यासोबत आज सकाळी ७:००…

Read More

सुरेश जैन यांचा महायुतीस पाठींबा ; ठाकरे गटास धक्का

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात जळगाव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदानाला दोन दिवस असतांनाच उद्धव ठाकरे गटास मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज दि.११ रोजी भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्याचे घोषित…

Read More
Top
error: Content is protected !!