Headlines

छत्रपती संभाजीनगरमध्ये साहित्य-नाट्य पुरस्कारांचा जागर; दत्ता देसाई आणि अतुल पेठे सन्मानित

​छत्रपती संभाजीनगर | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव पुरस्कृत ‘यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार’ व ‘नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार’ २०२६ चा गौरव सोहळा गुरुवार, १२ मार्च रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ​पुरस्कार निवडीचा निकष आणि परिचय ​कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवड समितीचे अध्यक्ष…

Read More

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बारामतीतून करण खलाटे प्रबळ दावेदार

पुणे l वास्तव पोस्ट : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड १८ मार्च रोजी होणार असून, या पदासाठी बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांचे नाव आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीत बारामतीला पुन्हा संधी मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्षअध्यक्ष व विविध…

Read More

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या ‘अनुभूती’चा डंका; कातकरी नृत्याने नाशिककर मंत्रमुग्ध!

वास्तव पोस्ट l जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या जागतिक स्तरावरील व्यासपीठावर जळगाव येथील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी आपल्या बहारदार ‘कातकरी नृत्याने’ उपस्थितांची मने जिंकत जळगावचा झेंडा दिमाखात फडकवला. १९ देशांतील प्रतिनिधींसमोर सादरीकरण नाशिक येथे संपन्न झालेल्या या…

Read More

मिहानमध्ये बनणार आधुनिक रोबोट्स आणि ड्रोन्स; सामरिक क्षेत्रात भारताचे पाऊल पडले पुढे!

वास्तव पोस्ट l नागपूर : जागतिक स्तरावर युद्धपद्धती आणि सुरक्षा व्यवस्था वेगाने बदलत असताना, तंत्रज्ञान आणि सामरिक क्षमता भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या मिहान परिसरात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लि. च्या ‘रोबोटिक्स अँड युएव्ही (UAV) फॅसिलिटी’चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या…

Read More

“अजितदादांसारखंच एकनाथ शिंदेंचं विमान पाडणार होते!” – रोहित पवारांचा गौप्यस्फोट

वास्तव पोस्ट l मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दि.४ मार्च बुधवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा पाठपुरावा करताना त्यांनी आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षिततेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकनाथ शिंदेंच्या विमानाला…

Read More

नागपूर हादरलं ! SBL कंपनीत भीषण स्फोट, १७ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू!

वास्तव पोस्ट l नागपूर : जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. काटोल तालुक्यातील राऊळगाव शिवारात असलेल्या SBL एनर्जी लिमिटेड या व्यावसायिक स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून, १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमकी घटना…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय ; VSR च्या विमानांना शिव सेनेचा ‘रामराम’!

वास्तव पोस्ट l मुंबई : राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आता VSR Ventures या कंपनीची विमानं आणि हेलिकॉप्टर्स न वापरण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेल्या या निर्णयामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील वाढत्या तांत्रिक त्रुटी आणि…

Read More

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

वास्तव पोस्ट l पुणे : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आज शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषातून संकटांशी लढण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी प्रजेला केंद्रस्थानी ठेवून कल्याणकारी राज्य उभारले. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा आणि पराक्रम यांच्या जोरावर त्यांनी काळाच्या पुढे विचार…

Read More

मालवण येथे शिवकालीन किल्ल्यांच्या अभ्यासासाठी अध्यासन केंद्र : मंत्री आशिष शेलार

वास्तव पोस्ट l मुंबई : सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठअंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी…

Read More

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ‘अर्थशॉट प्राईज’ कार्यक्रमाची घोषणा

वास्तव पोस्ट l मुंबई : राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई क्लायमेट विकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. याप्रसंगी अर्थशॉट प्राईजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ, पर्यावरण व वातावरणीय बदल…

Read More

सेवा, सहकार्य आणि समृद्धी – टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशनसोबत परिवर्तनाचा नवा अध्याय

वास्तव पोस्ट | मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये आणि टाटा ट्रस्ट्स तसेच महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये १२ सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. यामध्ये ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गडचिरोली जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्था, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल…

Read More

रोहित पवारांच्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये खळबळजनक खुलासे; अजित पवारांच्या विमान अपघातात घातपाताची शंका!

वास्तव पोस्ट ( मुंबई ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. हा अपघात नव्हता तर सुनियोजित घातपात असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रेस कॉन्फरन्समध्ये…

Read More

मुंबई विमानतळावर दोन विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक ; मोठी दुर्घटना टळली

मुंबई  ( वास्तव पोस्ट ) :  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांचे पंखे एकमेकांना धडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सदर घटना ही मुंबई विमानतळाच्या टॅक्सी-वे वर घडली. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते. महाराष्ट्र नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान…

Read More

धक्कादायक : पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड !

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज दि.३ मंगळवार रोजी घडली. हे हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघणार होते. पायलटने वेळीच हे दोष ओळखल्याने मोठा अपघात टळला आणि मुंडे यांनी आपला प्रवास स्थगित केला. घटनेची सविस्तर…

Read More

अमोल मिटकरींचे धक्कादायक प्रश्न : विमान अपघातात ६ मृत्यू ! मग सहावी व्यक्ती कुठे ?

बारामती ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात फक्त ५ मृतदेह सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत मिटकरींनी या घटनेच्या…

Read More
error: Content is protected !!