Home » महाराष्ट्र » ऊर्जा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ; मुळ वेतन आणि भत्त्यांत मोठी वाढ

ऊर्जा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ; मुळ वेतन आणि भत्त्यांत मोठी वाढ

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. आदींमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत, आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक घेतली.

यावेळी राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये खालील प्रमाणे ऐतिहासिक वाढ करण्याचा निर्णय घेतला.

त्यात मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ, सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ, सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता ५००० रूपयांची वाढ तसेच तांत्रिक कर्मचार्‍यांचा भत्ता ५०० रूपयांवरून १००० रूपये वाढ करण्यात आल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

यावेळी तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!