SANDIP RANDHE

धक्कादायक : गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून

सोलापूर | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगोला तालुक्यातील कोळा गावात काल रात्री दुचाकीला कट मारल्याने दोन गटात सशस्त्र हाणामारी होऊन त्यात दोघा तरूणांचा खून झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांच्या प्रत्येकी सहा-सहा अशा एकुण बारा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे. बाळू शामराव आलदर…

Read More

काँग्रेसच्या सहा आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो,…

Read More

मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी

जळगाव | दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज जळगाव येथील मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. यात दुर्गुण, भ्रष्टाचार, धुम्रपान, मद्यपान यांची होळी करण्यात आली. तसेच धुलिवंदन निमित्त नैसर्गिक रंग वापरण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना होळी सणाबद्दल माहिती सांगुन…

Read More

मोठी भविष्यवाणी: जरांगेंनी लोकसभा लढावी, ७०% मताधिक्य मिळणार; आमच्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

मुंबई | दि.२३ (वास्तव पोस्ट न्यूज )– मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील जालना लोकसभा निवडणूक लढवावी. तेथुन ७० टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देऊ शकतील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा‘ या खास…

Read More

साई नगरी शिर्डीत भरदुपारी गोळीबार ; वाढती गुन्हेगारी भक्तांसाठी चिंतेची बाब

शिर्डी | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– साईबाबांची नगरी शिर्डी मध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे शिर्डीतील नागरिकरांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. साईबाबा मंदिर आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या जवळच झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की २१ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी साईनाथ रवींद्र पवार आणि…

Read More

व्यूह रचना लोकसभेची: शिवसेना-उबाठा नेत्यांच्या एरंडोल व चाळीसगावात बैठकी; स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

पाचोरा | दि.२१ (वास्तव पोस्ट न्यूज)– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघात जोरदार रणनिती आखण्यास प्रारंभ केला असून, त्या अनुषंगाने आज एरंडोल आणि चाळीसगाव येथे पक्षाची बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणाला लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच…

Read More

मोठी बातमी : अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

दिल्ली | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– दिल्लीचे मुख्यमंत्री आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना शंभर कोटीं रुपयांच्या दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने अटक केली आहे. ईडीचे अधिकारी दोन तास केजरीवाल यांच्या घरी ठाण मांडून होते. दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी सांगितले की अटक जरी झाली असली तरी देखील केजरीवाल आपल्या मुख्यमंत्री पदाचा…

Read More

जिल्ह्यात कुटंणखान्यावर धाड ११ अटकेत,५० महिलांची कुटंणखान्यातून सुटका; शहरातही कारवाईचे संकेत !

जळगाव | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये रेड एरिया असुन याठीकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एसडीपीओ व चोपडा पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकुन कारवाई केल्याचे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी सांगितले सविस्तर वृत्त असे की चोपडा शहरामध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू…

Read More

गडकरींविरोधात नागपुरात बळकट उमेदवार देणार ! काँग्रेसचे बडे नेते एकवटले, हालचालींना वेग

मुंबई | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीमुळे सर्वच पक्षाचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. काँग्रेस आपल्याकडून नागपुरात नितीन गडकरींविरोधात ताकदवार उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले असुन काँग्रेसचे बडे नेते एकवटले आहेत व भेटीगाठी बैठकांना वेग आला आहे. भाजपने नागपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर…

Read More

उद्या होणाऱ्या तातडीच्या बैठकीत मविआच्या जागावाटपावर होणार शिक्कामोर्तब ? वंचितसह जागांचा तिढा सुटला !

मुंबई | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीच्या जागावाटप विषयी महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले असून यावर उद्या म्हणजे २१ गुरुवार रोजी मुंबईत अंतिम बैठक होणार आहे. या अंतिम बैठकीनंतरच महाविकास आघाडीची लोकसभा २०२४ च्या जागा वाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील….

Read More

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात मराठा समाजाकडून १ हजार उमेदवार !

धाराशिव | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक ठिकाणी जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या तसेच विरोधकांची राजकीय खेळी बघता कोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे यावरून सर्वच पक्षांची तारेवरची कसरत सुरू आहे. काहीठिकाणी उमेदवारांची घोषणा जरी झालेली असली तरी ऐनवेळी उमेदवार बदलतो की काय,…

Read More

तर पुण्यातील मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात येईल : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्पष्टीकरण

पुणे | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक देशात सात टप्प्यांत होणार असून, राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होत आहेत. दुसरीकडे मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेला मराठा समाज प्रत्येक गावातून लोकसभेला उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक असल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेता येईल का ? यावर…

Read More

केंद्रीय कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणूक २०२४ साठी जाहीरनामा ठरला

नवी दिल्ली | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांची घोषणा केल्यापासून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूक प्रचाराच्या रणनितीसोबतच आपला अजेंडा ठरवण्यात राजकीय पक्ष व्यस्त झाले आहेत. आपल्या जाहीरनाम्यातून जास्तीत जास्त जनेतला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस याबाबत सक्रीय झाली असून आज दिल्लीत काँग्रेस…

Read More

एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना बनावट एन्काऊंटर प्रकरणी जन्मठेप !

मुंबई | दि.१९( वास्तव पोस्ट न्यूज ) – एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती असलेले माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना लखन भैया चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शर्मा यांनी ३१२ एन्काऊंटरमध्ये भाग घेतला असून त्यांनी १०० हुन अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहे. अंडरवर्ल्डमधील गुंडांसह लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांचाही यात समावेश आहे. ११ नोव्हेंबर…

Read More

गांधी मैदानात १०,४९५ विद्यार्थ्यांचा मानवी रांगोळी साकारून मतदारांना संदेश; नॅशनल व आशिया पॅसिफिक रेकॉर्डची नोंद

कोल्हापूर | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने आज विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी (साखळी) साकारण्यात आली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले होते. लोकसभा निवडणूक २०२४…

Read More
error: Content is protected !!