SANDIP RANDHE

शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

पुणे ( वास्तव पोस्ट ) : स्वारगेट बसस्थानक आगारात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील एका गावातून अटक केली. सुमारे ७० तासांचा शोध मोहीमेनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. सापळा रचून ऊसाच्या शेतातून केली अटक संशयित दत्तात्रय गाडे हा घटनेनंतर…

Read More

जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचा शासन निर्णय निर्गमित ; जिल्ह्याच्या प्रगतीला मिळणार चालना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहराच्या विमानतळाच्या विस्तारीकरण व विकासासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, आज दि २७ फेब्रूवारी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ही विकास प्रक्रिया जळगाव जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरेल आणि व्यावसायिक, औद्योगिक तसेच नागरी विकासाला गती देईल. शासन निर्णयानुसार जळगाव विमानतळाच्या मूळ ४१ हेक्टर इतक्या जमीनीव्यतिरिक्त विस्तारीकरण करण्याकरीता…

Read More

धक्कादायक : पुण्यात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार !

PUNE BUS RAPE : पुण्यात बस आगारामध्ये एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली असून त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना झाली आहेत. पुणे ( वास्तव पोस्ट ) : पुण्यात आज एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे बस आगारामध्ये उभ्या केलेल्या…

Read More

‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ साठी नाशिक विभागातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व्दारा आयोजित ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ या पुरस्कारा करीता उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकन प्रकारात नाशिक विभागात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे. बालहक्क संरक्षण तसेच जळगाव जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल घेत, महाराष्ट्र राज्य बाल हक्क…

Read More

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य ; नाहरकत प्रमाणपत्र मुदतीत सादर करण्याचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत ५००० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाहीं तथापि ज्यांच्या…

Read More

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकला लोळविले ; विराट कोहलीचे नाबाद दमदार शतक !

दुबई ( वास्तव पोस्ट ) : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. यासह, संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १८० धावांनी पराभवाचा बदला घेतला. रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानने २४१ धावा केल्या. भारताने ४२.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून विराट कोहलीने नाबाद १००, श्रेयस अय्यरने ५६ आणि शुभमन गिलने ४६…

Read More

“आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” मध्ये टीम इंडियाची विजयी सलामी ; गिलचे शानदार शतक

दुबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय क्रिकेट संघाने ICC Champions Trophy 2025 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयाने सुरुवात केली. भारताच्या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने शानदार खेळी करत सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शतक झळकावण्याचा महान…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सर्वप्रथम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read More

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत झालेल्या १८ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : शनिवार दि.१५ रोजी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरी आणि मृत्यूंमागील कारण रेल्वे प्रशासनाचे निष्काळजीपणा असल्याचे आढळून आले आहे. रात्री ८ वाजल्यापासून रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढतच गेली, परंतु रेल्वेने त्यांना हाताळण्यासाठी वेळेवर कोणतीही पावले उचलली नाहीत. एवढेच नाही तर…

Read More

१०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी प्रभावी उपाययोजना ठरवण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील योजनांची सद्यस्थिती आणि आगामी कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करून शासनाच्या योजना…

Read More

घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यास एकूण ९० हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत ८४,६०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी शबरी, रमाई, पंतप्रधान आणि मोदी आवास या चारही घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी…

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन फौजदारी कायद्या संदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या…

Read More

१०वी व १२वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज १० मार्च पर्यंत स्वीकारले जाणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ पासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया ‘आपले सरकार’ पोर्टल द्वारा ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांनी या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे १० मार्च, २०२५ पर्यंत  सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Read More

राज्यमंत्री बोर्डीकर यांनी घेतला आरोग्य सुविधा, मनुष्यबळ आदीबाबींचा आढावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचा आढावा…

Read More

तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्या : पालकमंत्री जयकुमार रावल

नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शानदार शुभारंभ… धुळे ( वास्तव पोस्ट ) : “प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि प्रशासन अधिक गतीमान होईल,” असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. नाशिक विभागीय महसुल क्रीडा व…

Read More
error: Content is protected !!