Headlines
Home » जळगाव » राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती

जळगाव, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँगेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव महानगरातून निवड झालेल्या उमेदवारांमध्ये विशाल प्रकाश पाटील- वैद्यकीय सहाय्यक , स्वप्निल पंकज सोनार – वैद्यकीय सहाय्यक, शामकांत मनोहर काळे – समन्वयक , यांना नियुक्ती देण्यात आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच पक्षास सर्वोपतरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रूग्णसेवे सारख्या पवित्र कार्यासाठी निवड झाल्याबद्दल सर्वांचे विविध स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!