Home » जळगाव जिल्हा » नशिराबाद येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात अन्वरीया ग्रुप विजयी

नशिराबाद येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात अन्वरीया ग्रुप विजयी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नशिराबाद येथे सेवा फाऊंडेशन आयोजित दिवंगत माजी क्रिकेटपटू शेख जाकीर, फिरोज खान, जत्ताब खान, शेख बिस्मिल्ला, शेख जावेद, शेख तन्वीर, अब्दुल नबीयांच्या स्मरणार्थ वय ३० पेक्षा जास्त असलेल्या माजी खेळाडूंची मनियार लिजेंड क्रिकेट स्पर्धा नशिराबाद येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण ८ संघांनी आपला सहभाग नोंदवला.

अंतीम सामना रायझिंग स्टार आणि अन्वारीया ग्रुप यांच्या दरम्यान खेळविण्यात आला. रायझिंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४ षटकात ७ गडी बाद फक्त २० धावा करू शकला. गोलंदाजीत अन्वारीया ग्रुप कडून मतीन शेख व मोहम्मद फजल यांनी प्रत्येकी दोन तर अब्दुल यांनी एक गडी बाद केला. प्रतिउत्तरात अन्वारीया ग्रुप संघाने दोन षटकात तीन गडी बाद २५ धावा करून अंतीम सामना जिंकला. गोलंदाजीत सय्यद नईम व शेख नादर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. पंच व गुणलेखक म्हणून सय्यद फिरदौस वसीम शेख, शेख जफर, अमान शेख यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीतेसाठी शेख अन्सार, शेख अल्ताफ, शेख मुश्ताक, शेख जाविद, शेख मोईन, मोहम्मद फजल, शेख मतीन, यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!