Headlines
Home » क्राईम » पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर वसतिगृहात अ‍ॅसिड हल्ला

पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर वसतिगृहात अ‍ॅसिड हल्ला

पुणे | दि२६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिक्षणाचे माहेर घर येथे सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. दररोज काहीना काही घटाना समोर येत आहेत. अशातच पुणे येथे सिंबायोसिस महाविद्यालयाच्या वसतिगृहात आपल्या खोलीत झोपलेल्या एका तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकण्यात आले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. दरम्यान हल्लेखोराविरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हल्लेखोराचा पोलिस तपास करत आहेत.

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार आशिष हा रेंजहिल्स परिसरातील सिंबायोसिस बॉईज वसतिगृहामध्ये राहतो. शनिवारी दास हा त्याच्या वसतीगृहाच्या खोलीत रात्री ८.३० च्या सुमारास झोपलेला असतांना हल्लेखोर प्लास्टिकच्या मगमध्ये ॲसिडसदृश आशिषकुमारच्या अंगावर फेकुन फरार झाला. दरम्यान, झोपलेल्या आशिषकुमारच्या अंगावर रसायन पडल्यामुळे त्याने आरडाओरडा केली. त्याने दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या दरवाजाची कडी बाहेरून बंद होती. दरम्यान खोली तील आवाज ऐकुन त्याच्या बाजूच्या खोलीतील दूसऱ्या तरुणाने दरवाजा उघडला. आशिषकुमार नरेंद्रकुमार दास (वय २४, रा. सिंबायोसिस बॉईज हॉस्टेल, रेंजहिल्स) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणाने याबाबत तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक रूईकर तपास करत आहेत. पोलिसांनी वसतिगृहात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेले चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेतले असुन पोलिस पुढील तपास करतआहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!