जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वि.प्र.संदीप सोनवणे | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ‘आश्रय माझे घर’ मतीमंद मुलांचे आश्रयस्थान सावखेडा येथे मुलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. अतिशय आनंददायी वातावरणात मुलांना ओवाळुन गोडधोड खाऊ घालण्यात आले.

तसेच मुलांना कै.श्री.छगनराव परशराम नाईक आणि कै.सौ.रेवती छगनराव नाईक यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ भाऊबीजेच्या मंगल पर्वावर मसाला डोसे, चॅयनिज राईस, चटणी तसेच मोतीचुर लाडु, मोहनथाळ पेढे, बत्ताशे, नारळ चाॅकलेट, करदोडे असे सर्व मुलांना स्नेह भोजनात देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य रविंद्र नाईक जिल्हा क्रिडा अधिकारी जळगाव तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे किशोर सुर्यवंशी तसेच नितीन महाजन व डाॅ. नयना झोपे यांनी केले.

कार्यक्रमाला अनमोल असे सहकार्य सामाजसेवक चंद्रशेखर कापडे, ज्ञानेश्वर कुमावत, रेखा पाटील संचालिका आनंद आश्रय माझे घर तसेच आनिता किशोर सुर्यवंशी नुतन गणेश सुर्यवंशी
कृतिका किशोर सुर्यवंशी, शिवानी पवार, भारती कुमावत ज्ञानभारती फाउंडेशन अध्यक्ष, यामिनी नितीन महाजन, सौम्या पवार, चि.चिराग महाजन, आदित्य कापडे, रीतिक कुमावत, तेजस कुमावत, नील हिंगोणेकर यांनी कार्यक्रमाला उपस्थीती देऊन शोभा वाढविली.
