Home » जळगाव » जळगाव जिल्ह्याचे सौर ऊर्जा निर्मितीच्या दिशेने आश्वासक पाऊल

जळगाव जिल्ह्याचे सौर ऊर्जा निर्मितीच्या दिशेने आश्वासक पाऊल

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आपल्या राज्यात काही महिन्यापूर्वी सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्यात ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक आणि २५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच त्यावेळी घोषित केले होते की, ‘पुढच्यावर्षी ४० टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असून, शेतकर्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून तसे देकारपत्र सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले होते.

जळगाव जिल्ह्यात सौर कृषी वाहिनी योजनेतून ४८७० एकर जमीनीवर ९६४ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यामुळे १६५ विद्युत उपकेंद्र प्रभावित होणार आहेत. त्यापैकी ५८ उपकेंद्रासंबंधीच्या ३२८ मेगावॅट निविदा पूर्णत्वास आल्या आहेत. हे त्या यशाच्या दिशेनी जळगाव जिल्ह्याचे पाऊल आहे. या गोष्टीचा जिल्हा प्रशासनाला आनंद आहे. पुढचे टार्गेट पूर्ण करण्याला मिळालेले हे आत्मबळ आहे.

सौरऊर्जा प्रकल्प बसवल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचन यंत्रणेला वीज देण्यासाठी दिवसा वीज मिळेल. ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळेल. जळगाव जिल्हा राष्ट्रीय पॉवर ग्रीडमध्ये शाश्‍वत, पर्यावरणपूरक, नविकरणीय ऊर्जा जोडेल, जे भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि जळगावच्या विकासात योगदान देईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!