Home » जळगाव » जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.

शेतकरी आत्महत्या प्रकरणांतील चौकशी पूर्ण करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर करणे, शिधापत्रिका धारकांना मार्च महिन्याचे अन्नधान्याचे वितरण तातडीने पूर्ण करणे, लाभार्थ्यांना १२ अंकी क्रमांक उपलब्ध करुन देणे, साडी वाटप पूर्ण करणे, मनरेगाचे लेबर बजेट पूर्ण करणे, इ. कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच यावेळी महसूल वसुली उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेण्यात आला. १००% महसूल वसुली पूर्ण होईल यासाठी काटेकोरपणे नियोजन करुन अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!