Home » जळगाव » के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत स्नेहसंमेलन अनुगुंज २के२५ ला प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे करीता  पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून प्रमुख मान्यवर डॉ.शुभदा कुलकर्णी व डॉ.ममता दहाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ.सी.एस. पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील, एचआर विभाग प्रा.श्रुतिका घरडे यांचे हस्ते झाले. प्रमुख पाहुण्यांनी प्राध्यपकांना आनंदी राहून शिकवण्याची जबाबदारी कशी पार पाडावी यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. संजय सुगंधी यांनी प्राध्यापकांना सुप्त गुण सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

पहिल्या दिवशी प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी   वेस्टर्न डे, डेनिम डे, विभागीय बॉक्स क्रिकेट, बुद्धिबळ, रस्सीखेच अशा विविध कार्यक्रमात  सहभागी झाले होते. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सहकार्यांचे एकमेकांमधील स्ट्रॉंग नेटवर्क, माईंडफुलनेस व वेलबॉण्डिंग निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुरुवातीला वेस्टर्न लूक मध्ये असलेल्या सर्व प्राध्यापकांनी डान्स फ्लोअरवर लयबद्ध तालावर रॅम्प वॉक सादर केला. 

प्राध्यापकांनी या दिवसाच्या आनंददायी आठवणींना साठवून ठेवण्यासाठी सर्वानी हिरीहिरीने सहभागी होत फोटो सत्रात सेल्फी कॅप्चर केल्या. नंतर विविध खेळांमध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश पाटील व प्रा.श्रुतिका घरडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!