Home » राजकीय » लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! पुन्हा एक आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! पुन्हा एक आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

मुंबई | दि१७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – शिवसेना उबाठा गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळखले जाणारे, ठाकरे गटाचे नेते आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याप्रसंगी बोलतांना म्हटले की, आमश्या पाडवी यांनी आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी कायम संघर्ष केला, या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे या भागातील नागरिकांना न्याय देता येणे शक्य होईल.

यावेळी विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि १० महिला सरपंच, ४८ पुरुष सरपंच, २ जिल्हा परिषद सभापती, २ उपजिल्हाप्रमुख, ४ पंचायत समिती सदस्य, एक युवासेना जिल्हाधिकारी आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम- सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार संजय शिरसाट, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!