Home » महाराष्ट्र » आज ३९ मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ; जळगाव जिल्ह्यातून ३ मंत्री !

आज ३९ मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ; जळगाव जिल्ह्यातून ३ मंत्री !

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भाजप १९, शिवसेना शिंदे गट ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानंतर, राज्याच्या नव्या सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर पूर्ण झाला आहे. आज नागपूर येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली.

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये मंत्रीपदे आहे. परंतु १६ जिल्ह्यांमधी मंत्री म्हणून कोणालाच संधी मिळाली नाही. पुणे, जळगाव, नाशिकमधून प्रत्येकी तीन मंत्री झाले आहेत. तसेच साताऱ्यास सर्वाधिक चार मंत्रीपदे देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी असून त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे.

मंत्रिपदाची शपथ :
१) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा
२) राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा
३) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
४) चंद्रकांत पाटील, भाजपा
५) गिरीश महाजन, भाजपा
६) गुलाबराव पाटील, शिवसेना
७) गणेश नाईक, भाजपा
८) दादा भुसे, शिवसेना
९) संजय राठोड, शिवसेना
१०) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
११) मंगलप्रभात लोढा, भाजपा
१२) उदय सामंत, शिवसेना
१३) जयकुमार रावल, भाजपा
१४) पंकजा मुंडे, भाजपा
१५) अतुल सावे, भाजपा
१६) अशोक उईके, भाजपा
१७) शंभूराज देसाई, शिवसेना
१८) आशिष शेलार, भाजपा
१९) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
२०) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
२१) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा
२२) माणिकराव कोकाटे, भाजपा
२३) जयकुमार गोरे, भाजपा
२४) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
२५) संजय सावकारे, भाजपा,
२६) संजय शिरसाट, शिवसेना
२७) प्रताप सरनाईक, शिवसेना
२८) भरत गोगावले, शिवसेना
२९) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
३०) नितेश राणे, भाजपा
३१) आकाश फुंडकर, भाजपा

राज्यमंत्री पदाची शपथ :
३२) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
३३) प्रकाश आबिटकर, शिवसेना
३४) माधुरी मिसाळ, भाजपा (राज्यमंत्री)
३५) आशिष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री)
३६) पंकज भोयर, भाजपा (राज्यमंत्री)
३७) मेघना बोर्डीकर, भाजपा (राज्यमंत्री)
३८) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री)
३९) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!