शिक्षणाच्या स्वप्नांना ‘मालाबार’चा आधार! डॉ. बेंडाळे महाविद्यालयात ३१ विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण
जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या (CSR) उपक्रमांतर्गत जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गरजू व गुणवंत ३१ विद्यार्थिनींना एकूण २ लाख ६६ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
