Home » जळगाव » जळगाव येथे ‘मानवसेवा विद्यालयात’ जागतिक योग दिन साजरा

जळगाव येथे ‘मानवसेवा विद्यालयात’ जागतिक योग दिन साजरा

International Yoga Day 2024 : दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे विविध फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजर केला जातो.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विश्वप्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर मानेचे, खांद्यांचे, कमरेचे, पायांचे पूरक व्यायाम घेऊन प्राणायाम करण्यात आला.

यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे योगासन करण्यात आले. त्यात भुजंगासन, हालासन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासान, वज्रासन, सर्वांगासन, अनुलोम विलोम, कपालभारती व शेवटी शवासन घेण्यात आले. योग प्रात्यक्षिक मनोज बावस्कर व गिरीष जाधव यांनी दाखविली.

तसेच आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनी अंमली पदार्थ सेवन विरोधी शपथ देखील घेण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने आणि उत्साहाने विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!