Home » महाराष्ट्र » विधानसभा २०२४ : २८७ मतदारसंघात छाननीनंतर ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

विधानसभा २०२४ : २८७ मतदारसंघात छाननीनंतर ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.२९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.

या नामनिर्देशन पत्रांची दि.३० ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९७६ उमेदवारांपैकी ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

५६ नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर ०४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी (३१ ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!