Headlines
Home » महाराष्ट्र » पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत मोरेंचा जाहीर पक्षप्रवेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत मोरेंचा जाहीर पक्षप्रवेश

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी वसंत मोरे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच इतर अनेक शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान लोकसभेच्या काही दिवस आधी वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला होता. वंचितच्या तिकीटावर त्यांनी लोकसभा २०२४ निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. आता विधानसभेसाठी पुण्यातून शिवसेना ठाकरे पक्षाकड़ूंन त्यांना तिकीट दिले जाईल अशी चर्चा आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!