Headlines
Home » क्रीडा » तेलंगणा सरकारकडून मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड

तेलंगणा सरकारकडून मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड

Mohammed Siraj : टी-20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा सदस्य असलेला मोहम्मद सिराज याने नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. सीएम रेड्डी यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड देण्याची घोषणा केली आहे.

तेलंगणा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मोहम्मद सिराज हा टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. टी-20 वर्ल्डकप जिंकून भारतात परतलेल्या खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच सिराज याची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड देण्याची घोषणा केली आहे. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनही उपस्थित होता. तेलंगणाच्या सीएमओने या बैठकीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

दरम्यान टी-20 वर्ल्ड चॅम्पियन मोहम्मद सिराज याने नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी सीएम रेड्डी यांनी सिराजसाठी सरकारी नोकरी आणि भूखंड देण्याची घोषणा केली आहे. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. टी-20 वर्ल्डकप जिंकून भारतात परतलेल्या खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराज याची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. हैदराबादमध्ये घर बांधण्यासाठी सिराजला जमीन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यावेळी सिराज याने मुख्यमंत्र्यांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली.

मोहम्मद सिराज हा मूळचा तेलंगणाचा आहे. टीम इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. आयपीएलच्या पहिल्या होम मॅचमध्ये सिराजने घातक गोलंदाजी केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. सिराजच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती चमकदार आहे. सिराजने भारतासाठी ४१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात ६८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २७ कसोटी सामन्यात ७४ बळी घेतले आहेत. सिराजने भारतासाठी १३ टी-20 सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!