Headlines
Home » जळगाव » काव्य रत्नावली चौकात ज्वलंत विषयांवर विविध पथनाट्ये सादर

काव्य रत्नावली चौकात ज्वलंत विषयांवर विविध पथनाट्ये सादर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सायंकाळी पाच वाजता, ‘कायदेविषयक जागरूकता’ या संकल्पनेतून एस.एस. मणियार विधी महाविद्यालय जळगाव, रोटरी क्लब जळगाव आणि विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ता सुरक्षा’ तसेच ‘कौटुंबिक हिंसाचार’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ इत्यादी या ज्वलंत विषयांवर आधारित विविध पथनाट्ये सादर करण्यात आलीत.

यावेळी सय्यद, सचिव विधी सेवा प्राधिकरण जळगाव, रोटरी क्लबचे ॲड. हेमंत भंगाळे व इतर सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवाकुमार रेड्डी, विधी सेवा संघाचे समन्वयक प्रा.डॉ. योगेश महाजन, डॉ.रेखा पाहुजा, प्रा.डॉ. विजेता सिंग, प्रा.डॉ. अंजली बोंदार, प्रा.शरद चव्हाण, प्रा.बी.एस. पाटील, सर्व कायद्याचे अध्ययन करणारे विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणावर सर्वसाधारण नागरिक उपस्थित होते.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे पथनाट्यांचे सादरीकरण तर केलेच त्यासोबतच कायदेविषयक जनजागृती आणि मोफत कायदेशीर सल्ला या संदर्भात जनजागृती करणारे लक्षवेधी माहिती फलक देखील प्रदर्शित करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!