Headlines
Home » जळगाव » ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ कार्यशाळेत तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन

‘आत्मनिर्भर युवती अभियान’ कार्यशाळेत तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : दि.२२ जानेवारी २०२५ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगांव येथे आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील युवतींना योगासन, प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले व विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ.विजेता सिंग प्राध्यापक मणियार विधी महाविद्यालय जळगांव यांनी ‘महिलाविषयक कायदे’ यावर मार्गदर्शन केले. डॉ.रेखा पाहुजा प्राध्यापक मणियार विधी महाविद्यालय जळगांव यांनी ‘महिला सबलीकरण कायदे व शासन योजना’ यावर मार्गदर्शन केले. डॉ.कविता पवार प्राध्यापक आय.एम.आर. महविद्यालय यांनी ‘साॅफ्ट स्किल’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा.प्रविण कोल्हे प्राध्यापक केसीई सोसायटिचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांनी ‘फिजिकल फिटनेस’ वर मार्गदर्शन केले. डॉ.अंजली बोंदर प्राध्यापक मणियार विधी महाविद्यालय जळगांव यांनी ‘भारतीय महिला सबलीकरण कायदे विषयक इतिहास व सद्यस्थिती’ यावर मार्गदर्शन केले.

व्याख्यान मालेत तज्ज्ञांनी महिला सबलीकरण कायदे आणि सद्यस्थिती मधील महिलांची स्थिती यांचा विचार केला. तसेच प्रत्येक क्षेत्रात महिला आता आपला विकास करत आहे असे मत मांडले. तसेच शासनाच्या विविध योजना, शिक्षणासाठी सुविधा आणि महिलांचा वाढता सहभाग उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट केले. संविधानाच्या माध्यमातून महिलांना समानतेचा अधिकार मिळाल्यामुळे महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. या आत्मनिर्भर युवती अभियाना सारख्या विविध उपक्रमातून देखील महाविद्यालयातील युवतींना आपले अधिकार व जबाबदाऱ्या समजतील असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी ‘महिला सबलीकरण कायदे व योजना कश्या प्रकारे महिलांच्या विकासात योगदान देतात हे सांगितले‌.विचार मंचावर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.केतन चौधरी व आत्मनिर्भर युवती अभियानाच्या समन्वयिका डॉ.पूनम जमधडे ह्या उपस्थित होत्या.

समारोप समारंभ प्रसंगी सुत्रसंचालन अपूर्वा पाटील ह्या विद्यार्थींनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थीनी पारली पावरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!