Headlines
Home » राष्ट्रीय » विरोधी पक्षनेते पदी रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची निवड

विरोधी पक्षनेते पदी रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची निवड

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेसनेही दहा वर्षांनी चांगली कामगिरी केली असल्याने ह्यावेळी लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे.

आज काँग्रेसच्या संसदीय मंडाळाच्या झालेल्या बैठकीत रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती काँग्रेसचे महासचिव केसी वेनुगापाल यांनी प्रसार मध्यमांसमोर दिली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याशिवाय लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनाही याबाबत पत्र लिहून माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!