Headlines
Home » जळगाव » कजगावं येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी साजरी

कजगावं येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी साजरी

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगांव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले फाउंडेशन माळी पंचमंडळ कजगाव यांच्या वतीने किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन देखील संपूर्ण माळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी कै. त्रंबक शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ हिलाल चौधरी यांच्या सौजन्याने भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण, कै. तुकाराम शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ मंदिराच्या खोलीचा शुभारंभ व कै.हिलाल फकीरा महाजन, कै.कस्तुराबाई हिलाल महाजन, कै.केशव हिलाल महाजन यांच्या स्मरणार्थ भानुदास हीलाल महाजन माजी सरपंच यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ शुभारंभ व आमदार निधीतून सावता माळी मंदिरासाठी सभा मंडपाचे उद्घाटन पाचोरा-भडगाव विधानसभाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी सरपंच रघुनाथ महाजन, महात्मा फुले फाउंडेशन माळी पचं मडळ कजागव अध्यक्ष अनिल रघुनाथ महाजन, उपाध्यक्ष अनिल पांडूरंग महाजन व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!