जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत स्थानिक बसस्थानक परिसरामध्ये तसेच नेहरू चौक परिसरामध्ये प्लास्टिक मुक्ती तसेच स्वच्छता करून खऱ्या अर्थाने महात्मा गांधी यांना आदरांजली दिली. या मोहिमेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कुलसचिव प्रा.डॉ.पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.डॉ. सचिन नांद्रे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी जळगाव शहरातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी हजार होते. मुळजी जेठा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. विशाल देशमुख तसेच महिला सहाय्यक कार्यक्रमाधिकरी डॉ. जयश्री भिरुड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. तसेच स्वच्छतेची शपथ घेऊन १०० तास स्वच्छता करू असा निर्धार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.
