Home » महाराष्ट्र » … तर लाडकी बहीण योजनेचे पैशे परत घेऊ : आमदार रवी राणा यांचे वादग्रस्त विधान

… तर लाडकी बहीण योजनेचे पैशे परत घेऊ : आमदार रवी राणा यांचे वादग्रस्त विधान

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेस घोषणा झाल्यापासून राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून अजूनही अर्ज केले जात आहेत.

या योजनेच्या प्रचारासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून या योजनेवर टीकाही केली जात आहे. अशातच आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन केलेले वादग्रस्त विधान चांगलेच गाजत आहे.

दरम्यान अमरावतीत आज आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांना संबोधित करताना आमदार रवी राणा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांवरून ३हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जर मला आशीर्वाद देणार नाही, तर मी तुमचा भाऊ असून १५०० रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!