पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : तालुक्यातील गहुले सातगाव येथील विविध पदाधिकार्यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला असून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.
दिवसेंदिवस शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणार्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. यातच आता गहुले सातगाव येथील मान्यवरांचे इनकमींग झाले. यात प्रामुख्याने अजरोद्दीन जैनोद्दिन तडवी, जिभाऊ नाना तडवी, जावेद उसमोद्दीन तडवी, सागर अरमान तडवी, आकाश बाबूलाल तडवी, समीर दिलीप तडवी, राहूल सलीम तडवी, इजाज अरमान तडवी, विशाल सलीम तडवी, अफसर शफीक तडवी, अस्लम मशीद तडवी, जब्बार जमन तडवी, रणजीत दिलीप तडवी, लालखा फकिरा तडवी, शारूख जम्मन तडवी, तालीब इस्मद्दीन तडवी आणि अनिलदादा तडवी यांचा प्रवेश घेणार्यांमध्ये समावेश होता.
पक्षात आलेल्यांचे वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी स्वागत केले. याप्रसंगी उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी व माजी उपजिल्हा प्रमुख अभय पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
