Headlines
Home » क्रीडा » दुसऱ्या T20 त टीम इंडियाकडून झिम्बाब्वेला जोरदार दणका ; १०० धावांनी मोठा विजय

दुसऱ्या T20 त टीम इंडियाकडून झिम्बाब्वेला जोरदार दणका ; १०० धावांनी मोठा विजय

हरारे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय संघ सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे येथे आज ७ जुलै टीम इंडिया आणि झिम्बाब्वे संघांमध्ये ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने २० षटकात २ बाद २३४ धावांचा डोंगर उभारला. झिम्बाब्वेला विजयासाठी २३५ धावा कराव्या लागणार आहेत.

या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब आणि संथ झाली. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाची धावसंख्या म्हणजे पहिल्या ६ षटकांत एका विकेटवर ३० धावा होती.

यानंतर १० षटकांत धावसंख्या एका विकेटवर ७४ धावा होती. त्यानंतर शेवटच्या ६० चेंडूत भारताने १६० धावांचा पाऊस पाडला. भारताकडून अभिषेक शर्माने ४७ चेंडूत १०० धावा, ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूत नाबाद ७७ धावा आणि रिंकू सिंगने अवघ्या २२ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. अभिषेकने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. गायकवाडने ११ चौकार आणि एक षटकार लगावला. याशिवाय रिंकूने २ चौकार आणि ५ षटकार ठोकले. ऋतुराज आणि रिंकू यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ३६ चेंडूत ८७ धावांची नाबाद भागीदारी झाली. तर अभिषेकने गायकवाडसोबत १३७ धावांची भागीदारी केली. अभिषेकने वेलिंग्टन मसकडजाला सलग तीन षटकार मारून शतक पूर्ण केले. मात्र, वेलिंग्टन मसकडजाच्या पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला.

झिम्बाब्वेच्या डावाची सुरवात खराब झाली. पहिल्याच षटकात मुकेशने हादरा दिल्यानंतर मात्र तिसऱ्या षटकात झिम्बाब्वेने जोरदार प्रहार केला. मात्र पॉवर प्ले मध्ये ४ गडी बाद झाल्यामुळे त्यांच्या धावांवर अंकुश लागला. झिम्बाब्वेकडून माधवेरे ४३, ल्यूक ३३, आणि ब्रायन बेन्नेट याने २६ धावा केल्या. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले. झिम्बाब्वेचा डाव १८.४ षटकात १३४ धावांवर आटोपला. भारताकडून आवेशने १५ धावा देत ३, मुकेश ने ३७ धावात ३ तर बिश्नोई याने ११ धावा देत २ गडी बाद केले.

दरम्यान पहिल्या सामन्यात भारतीय संघाला १३ धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशाप्रकारे झिम्बाब्वे मालिकेत १-० ने पुढे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!