Home » जळगाव » खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थे च्या अध्यक्षपदी संतोष मराठे

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थे च्या अध्यक्षपदी संतोष मराठे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील एकमेव असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या पतसंस्थेची दि. २१ रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकित अध्यक्षपदी भुसावळ येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदीर येथील संतोष मराठे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पारोळा येथील जयहिंद प्राथमिक विद्यामंदीर चे मुख्याध्यापक वना महाजन यांची निवड करण्यात आली.

यावेळी खाजगी शाळा कर्मचारी पतसंस्था मर्यादित जळगाव चे माजी अध्यक्ष बोरोले, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संचालक प्रशांत साखरे, स्वप्निल पाटील, राकेश पाटील, अविनाश घुगे, गणेश लोडते, अमित चौधरी, प्रफुल्ल सरोदे, धनंजय काकडे, रूपाली पाटील, तज्ञ संचालक अमोल भारंबे, निखील जोगी  आदि उपस्थित होते.

या निवडीबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील उपशिक्षणाधिकारी, विजय सरोदे, नरेंद्र चौधरी तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी आणि चोपडा तालुका संघटनेचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व मित्र परिवारातर्फे देखील संतोष मराठे यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!