Home » क्रीडा » षटकारांचा बादशहा रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 ला केले अलविदा

षटकारांचा बादशहा रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 ला केले अलविदा

Rohit Sharma announces retirement from T20 : भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा टी-20 क्रिकेट मध्ये विश्वविजेता बनवून रोहित शर्मा ने या छोट्या फॉरमेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

वास्तव पोस्ट न्यूज | टी -20 विश्वकप २०२४ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या तुफान गोलंदाजी आणि अप्रतिम फिल्डिंगच्या तसेच टीमवर्कच्या बळावर दक्षिण आफ्रिके विरूद्धचा थरारक सामना जिंकून टीम इंडियाला टी 20 वर्ल्डकप चॅम्पियन केल्यानतंर कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या निवृत्तीची मोठी घोषणा केली आहे.

टीम इंडियाने तब्बल १७ वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला. दरम्यान टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर आणि टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. ‘हा माझा शेवटचा सामना होता. टी-20 फॉरमॅटमधील प्रत्येक सामन्यातील क्षण मी एन्जॉय केला,’ असे वक्तव्य निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली.

दरम्याम काल टीम इंडियाने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप २०२४ फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी थरारक विजय मिळवला. टीम इंडियाने अक्षरशः दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला.

रोहितने इंग्लंड विरुद्ध २००७ मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले होते. रोहितने १५९ सामन्यांमध्ये १४०.८९ च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.३४ च्या एव्हरेजने ४२३१ धावा केल्या असुन रोहितने ५ शतकं आणि ३२ अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात १२१ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नावे १ विकेटही आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!