Headlines
Home » जळगाव » ओरियन सीबीएसई स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा

ओरियन सीबीएसई स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा जल्लोषात साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा अनुभवला.

याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी विठ्ठल-रुक्मिणी पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भक्तिमय गीतांवर नृत्य आणि पावली सादर केली. कार्यक्रमात संगीत शिक्षकांतर्फे भक्तिमय गीतांचा कार्यक्रम देखील रंगला. शाळेचा संपूर्ण परिसर आणि मृदुंगाचा आवाजाने भक्तीमय वातावरणात रंगून गेला होता. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!