Headlines
Home » राष्ट्रीय » रक्षा खडसे यांनी स्वीकारला राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाचा कार्यभार

रक्षा खडसे यांनी स्वीकारला राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाचा कार्यभार

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील ३१ कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि ५ स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज दि.११ रोजी या सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. त्यात रक्षा निखिल खडसे यांनीही आज शास्त्री भवनात क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. क्रीडा विभागाचे सचिव आणि युवा कार्य विभागाचे सचिव यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. रक्षा निखिल खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच केंद्रीय मंत्र्यांना मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती दिली.

दरम्यान क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पदभार स्विकारल्यानंतर आपल्या X या सोशल मिडिया अकाउंटवर याबाबत माहिती दिली. त्यात रक्षा खडसे म्हणतात की, मी आनंद आणि जबाबदारीच्या भावनेने राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. देशभरातील खेळाडूंच्या भूतकाळातील प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक स्पोर्टिंग पॉवरहाऊस बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा व्यक्त करून प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक क्रीडा शक्ती केंद्र बनवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच मनसुख मांडविया यांनीही आज शास्त्री भवनात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रीपदही आहे.यापूर्वी त्यांनी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. यावेळी युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती. यावेळी रक्षा निखिल खडसेही उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!