Home » महाराष्ट्र » मसाज पार्लरवर धाड ; नको त्या अवस्थेत सापडल्या तरुण मुली !

मसाज पार्लरवर धाड ; नको त्या अवस्थेत सापडल्या तरुण मुली !

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती येथील राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा-मसाज सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकत स्पा भागीदारासह चार तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतले. या स्पा सेंटरवर मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय आणि तरुणाईचे अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. याआधारे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहीतीनुसार मागील एक वर्षापासून हा स्पा सुरु असल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक संशयास्पद साहित्य आढळून आले. हे सगळे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काही अंडरगारमेंट्स बाथरुममध्ये आढळून आले. अमरावती शहराच्या मध्यवस्तीत अशाप्रकारे सुरू असलेल्या अवैध धंद्यांबद्दल काही लोकप्रतिनिधींनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पावर मसाजच्या आड देहविक्रीचा व्यवसाय व तरूणाईचे अश्लिल चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. स्पा मध्ये मसाजच्या आड अन्य गोरखधंदा सुरू असल्याने तेथील रहिवाशांनी एका माजी नगरसेवकास त्याबाबत माहिती दिली. सदर नगरसेवकाने त्या स्पामध्ये जाऊन तेथील सहमालकासह इतरांना तंबी दिली. त्यानंतर सिटी कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांना माहिती दिली. पोलीसांनी तेथून चार तरूण व तीन तरूणींना ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!