नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी अचानक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले. राहुल गांधी यांनी येथील लोको पायलटसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोको पायलटसोबत चर्चा केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज, शुक्रवारी दुपारी अचानक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथे लोको पायलट लॉबीमध्ये जाऊन तेथे उपस्थित लोकांशी बोलून ट्रेनच्या कामकाजाची माहिती घेतली. राहुल गांधी यांनी लोको पायलटशी बोलून त्यांच्या समस्याही विचारल्या.
तत्पूर्वी गुरुवारी राहुल गांधी दिल्लीतील जीटीबी नगरमध्ये पोहोचले होते. येथे ते फावडे उचलून त्यांनी रोजंदारी मजुरांसोबत काम केले. याशिवाय त्यांच्या तब्येतीचीही माहिती घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी सिमेंट आणि विटांनी भिंतीचे दगडी बांधकामही केले. कामगारांच्या समस्याही त्यांना विचारल्या. तसेच काय काम करतात अशी विचारणा केली. यानंतर ते किंग्सवे कॅम्पला गेले.
