Home » जळगाव » पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२८ वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२८ वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ वी पुण्यतिथी निमित्त निमखेडी शिवार जळगाव येथे जळगाव शहर अहिल्या महिला संघ व धनगर समाज कर्मचारी संघटना यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्या मातेस पूजा व फुलहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी डी.बी. पांढरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय दिला. तसेच अहिल्या महिला संघाच्या शहर सचिव भाग्यश्री सोनवणे, भारती कचरे, स्वाती पांढरे, मनीषा साबळे, शारदा बावस्कर, कल्पना पवार, सुरेखा सपकाळे, नीलिमा प्रवीण धनगर तसेच, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे टी.बी. पांढरे, बनसोडे, अशोक सपकाळे, विजय पवार, संतोष कचरे, लीलाधर बावस्कर, प्रवीण धनगर, विनोद सावळे, अनिल मनोरे, विष्णू साबळे, एड. न्हायदे, निंबा पाटील, भीमराव सूर्यवंशी, बोरसे, डी.बी. पांढरे आणि तुळशीराम सोनवणे हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!