नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत संघर्ष समितीच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना ‘सीटु’ च्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या
१) नव्याने ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले त्या सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे जोपर्यंत समावेशन होत नाही तोपर्यंत त्यांना किमान वेतन व समान कामाला समान वेतन देण्यात यावे.
२) अनुकंपावरील भरती त्वरित करण्यात यावी.
३) एक तारखेच्या आत सर्वांचे वेतन देण्यात यावे.
४) सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी.
५) कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन न देणाऱ्या ठेकेदारांचे लायसन रद्द करण्यात यावे.
या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना सिटु चे जिल्हा अध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉ देविदास आडोळे, कॉ सुनील मालुसरे, महाराष्ट्र नगरपालिकेचे जनरल सेक्रेटरी कॉ रामदास पगारे, कॉ तुकाराम सोनजे, कॉ हिरामण तेलोरे, कॉ राहुल गायकवाड, कॉ छाया जाधव, कॉ अरविंद शहापुरे, कॉ संतोष काकडे, कॉ सदानंद शेळके, कॉ मोहन जाधव कॉ युवराज पाटील, कॉ निवृत्ती केदार, कॉ गौतम कोंगळे, कॉ दत्ता राक्षे, कॉ साहेबराव गायकवाड, कॉ शशिकांत भालेराव, कॉ अनिल गायकवाड, कॉ सुधाकर अहिरे तसेच नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
