Home » जळगाव » प्रा. मनोज मोरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

प्रा. मनोज मोरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नुतन मराठा डी.एड. कॉलेजचे प्रा. मनोज भाऊराव मोरे यांचे आज दि.११ रोजी मध्य रात्री १२.१५ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते आपल्या कुटुंबासह आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा, जळगाव येथे वास्तव्यास होते. आज दुपारी २:१५ च्या सुमारास पिंप्राळा स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रा. मनोज मोरे हे अतिशय मनमिळावू , नम्र तसेच विद्यार्थ्यांप्रती आपुलकीचे संबंध ठेवणारे होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर तसेच शिक्षण क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रा. मनोज मोरे यांच्या पश्चात शिक्षिका पत्नी, एक मुलगा, आई, आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सतीष मोरे व ॲड.जयंत मोरे यांचे ते भाऊ होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!