Home » राष्ट्रीय » प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात ; वायनाड पोटनिवडणूक लढवणार

प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात ; वायनाड पोटनिवडणूक लढवणार

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खासदार राहुल गांधी यांनी वायनाडमधून आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेलीतून खासदार म्हणून काम करणार आहेत. २०२४ च्या लोकसभेसाठी त्यांनी वायनाड आणि रायबरेली अशा दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते

दरम्यान राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघ सोडून ते रायबरेली मतदारसंघातूनच खासदार राहणार आहेत. तसेच प्रियांका गांधी ह्या आता वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही माहिती दिली.

विजयानंतर राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यांनी राजीनामा देण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देखील मागवली होती.

रायबरेली हा राहुल गांधी यांच्या कुटुंबाचे पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. या जागेवरून सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीही खासदार झाल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून सीपीआयच्या एनी राजा यांचा ३ लाख ६४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तर रायबरेलीमधूनही ते साडेतीन लाख मतांनी विजयी झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. पण वायनाडमध्ये ४.३१ मतांनी विजय झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!