जळगाव ( वास्तव पोस्ट ) : फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) निकालात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड विद्यालयाने आपली गौरवशाली यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला.
विद्यालयातून प्रथम – रोहन संदीप पाटील ९९%, द्वितीय – अनुश्री सुनील निंभोरे ९८% तर तृतीय – मयंक प्रशांत वाणी ९७.४०% या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

विद्यालयातील एकूण १८ विद्यार्थ्यांना ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. तर ९० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे ८५ विद्यार्थी आहेत. गुणवंत विद्यार्थी रोहन संदीप पाटील, अनुश्री सुनील निंभोरे, मयंक प्रशांत वाणी, जान्हवी पंकज लोखंडे, श्रद्धा सुरेश रायसिंग, पुजा दिगंबर महाजन या विद्यार्थ्यांचे त्याच बरोबर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचें कौतुक व अभिनंदन के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सोसायटीचे संचालक डॉ.अशोक राणे, मानव संसाधन विभाग प्रमुख माननीय गोकूळ पाटील व विद्यालयाचे प्राचार्य श्रीधर सुनकरी यांनी केले. उपप्राचार्या रजनी गोजोरेकर व सर्व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.
