Headlines
Home » जळगाव » बुद्ध पौर्णिमा व डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती दिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळा संपन्न

बुद्ध पौर्णिमा व डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती दिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा बुद्ध पौर्णिमा आणि आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि.१२ मे रोजी सकाळी ६ ते ७ या वेळात करण्यात आले. सोहम योग केंद्राचे संचालक योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेमध्ये सामुहिक ध्यानसाधनेचा अभ्यास करून घेण्यात आला. कार्यशाळेमध्ये ६० पेक्षा अधिक महिला पुरुष आणि विद्यार्थ्यांनी ऑफलाईन आणि ऑनलाइन सहभाग नोंदविला.

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागातील आनंदयात्री योग सभागृहामध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेमध्ये ध्यान साधने नंतर भगवान गौतम बुध्द आणि डॉ. जी.डी. बेंडाळे यांचे स्मरण करण्यात आले. शांतिपाठ करून कार्यशाळेची सांगता करण्यात आली. प्राचार्य डॉ. संजय ना. भारंबे यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. पंकज खाजबागे, प्रा. ज्योती वाघ, प्रा. श्रद्धा व्यास यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!