Home » जळगाव » स्वछता पंधरवाड्यानिमित्त बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि सायबर क्राईम विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

स्वछता पंधरवाड्यानिमित्त बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि सायबर क्राईम विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकार व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव तसेच ज्ञानभारती फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्येमाने स्वच्छता पंधरवाडा निमित्त खेळाडु युवकांकरीता बाललैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ पोक्सो व तसेच सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सायबर क्राईम बद्दल सखोल मार्गदर्शन डाॕ. नयना झोपे यांनी केले, तसेच पोक्सो कायदा सविस्तर माहिती मुलांना देण्यात आली. सेफ टच अनसेफ टच म्हणजे गुड टच बॅड टच बद्दल सखोल माहीती व कायदा काउंसलर भारती कुमावत मॅडम यांनी सांगितली.

कार्यक्रमाला जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्रजी नाईक उपस्थीत होते. तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, क्रीडा अधिकारी सुरेश थरकुडे, क्रीडा मार्गदर्शिका चंचल माळी तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू युवक मुले मुली उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र नाईक यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी सुरेश थरकुडे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!